समाज सेवेच्या नावाखाली काही दलालांनी विवाह मंडळ सुरु करून भोळ्या भाबड्या आणि गरजू वधू -वर माता-पित्यांची फसवणूक करून स्वताहाचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय सुरु केला आहे . एकेकाळी दोन वेळचे खाण्याचे वांधे असलेले काही दलाल समाजातील प्रतिष्टीत म्हणून मिरवतात आणि लग्न सराईत तर दोन्ही वेळेला सह्कुटुंब पंचपक्वान भोजनास जातात .
सुरुवातीला हे दलाल ५००/- ते २०००/- रजिस्ट्रेशन फी घेतात . चुकून समजा ह्यांच्या मंडळातील एखादे स्थळ ठीक वाटले आणि जमते नाही कुठे तर हि मंडळी ५०००/- ते १५०००/- देणगी म्हणून मागतात . किंवा उंची वस्त्रे ( जसे ब्लेझर , थ्री पीस ) ह्या सर्वांची स्वतःच्या तोंडाने मागणी करतात . लग्न जमवून दिल्यासारखे हे स्वतःला ब्रम्ह्देवच समजतात .
मी हे जे काही लिहिले आहे ते मी स्वतः बघितले आहे म्हणूनच अश्या भामट्या दलालांना चाप बसावी आणि आपल्या सुशिक्षित उपवर मुलांना अनुरूप जोडीदार मिळावा यासाठी आपली माहिती http://www .malisamaj .info या वेबसाईट वर टाका . हि वेबसाईट सर्व समाज बांधवांसाठी विनामूल्य चालू करतो आहे . ह्या वेबसाईट वर तुमची माहिती जगभर प्रसिध्द होईल तसेच तुम्ही देखील तुमच्या परीजनाना फायद्यासाठी ह्या वेबसाईटची माहिती द्यावी व अश्या दलालांना तुमच्याकडूनही चपराक द्यावी . _ श्री . यतिन जेजुरकर , नाशिक ८८५५९९८०३३


Click to Entershubhmangalsavdhan